आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची धारावी झोपडपट्टीला भेट

0

मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर याभागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दि. ०७ एप्रिलला सायंकाळी धारावीला भेट दिली. त्यांनी या भागात केवळ कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पीटलला भेट देऊन व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here