रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर रत्नागिरीच्या खाडीकिनारी वसलेल्या राजिवडा परिसरातील काही नागरिक मच्छीमारी नौकांकडून अन्यत्र जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून येत होते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मत्स्य विभागाकडून दोन मच्छीमारी नौकांसह चार सुरक्षा रक्षकांची गस्त सुरू करण्यात आली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सूचनेनुसार ही कार्यवाही केली आहे. तसेच राजिवडा परिसरात ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याशिवाय मच्छीमारी जेट्यांवरही नजर ठेवण्यात आली आहे.
