रत्नागिरी येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

0

रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुक्याची आढावा बैठक संपन्न झाली. टीआरपी येथील अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी रविवारी जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांच्या उपस्थितीत या बैठकीत रत्नागिरी तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वाढीसाठी तसेच आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुकीसंबंधित सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित बहजन आघाडी सदस्य मोहीम राबविणे, पक्षबांधणी – विस्तार व संघटन याचबरोबर पक्षाला बळकटी प्राप्त करण्याच्या हेतूने आपल्याला जे जे सकारात्मक पावले उचलता येईल संघटितरीत्या कार्य कसे करता येईल ते सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत सावंत, तालुकाध्यक्ष रवींद्र कोकरे, तालुका सचिव मुकुंद सावंत, महेंद्र पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here