स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

0

पावस : येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी पाच लाख अशी दहा लाख रुपयांची मदत केली. हे दोन्ही धनादेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन तात्काळ निधी देण्याचे ठरविले. यावेळी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत तथा विजय देसाई, कार्यवाह ऋषीकेश पटवर्धन, उद्योजक राजेंद्र जोशी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होते. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी विशेष आभार मानले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here