सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांच्या पंतप्रधानाकडे ‘या’ मागण्या

0

कोरोनाच्या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच सर्व राज्य सरकारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा वाढत संसर्ग आणि लॉकडाऊनवरील पुढील कार्यवाहीबाबत चर्चा कारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या फ्लोअर नेत्यांसोबत बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोरोनाच्या मोफत चाचणीची मागणी केली आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींकडे केलेल्या मागण्यांमध्ये राज्यांच्या एफआरबीएमची राजकोषीय वित्तीय मर्यादा 3 ते 5 टक्के करावी, राज्यांचा थकीत निधी द्यावा, कॊरोनाबाबतच्या मदत पॅकेजची मर्यादा 1 टक्क्यावरून 5 टक्के करावी, पीपीईसह सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध करावीत, या मागण्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here