बेकायदा जमाव केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

0

राजापूर : लॉकडाऊनच्या काळात सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असतानाही राजापूर येथील मापारी मोहल्यामधील मशिदीमध्ये बेकायदा जमाव करून नमाजपठण केल्यापकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलिसांनी यांना अटक केली आहे. शुकवारी सायंकाळी राजापूर मापारी मोहल्ला येथील गुळीकर मशिदीमध्ये सामुहीक नमाजपठण होत असल्याचे राजापूर पोलिसांच्या निदर्शनास आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अशफाक अब्दुल रहमान मापारी, मोहम्मद गुफरान बशीर काझी, जाईदअल्ली असलम नाईक, अब्दुल अझीज इब्राहीम मापारी, फैसल हाफिज पठाण, अन्वर महमद सय्यद, कमरूद्दीन हसन पन्हाळकर, मजिद अब्दल रेहमान जवाहिरे, रिझवान इब्राहीम मापारी, महंमद जुहेर मुन्ना खान, मुशताक अल्लीसाहेब बांगी (सर्व रा. मापारी म मोहल्ला) यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here