चिपळूण मधील बँकेचे एटीएम फोडून रक्कम चोरणाऱ्या टोळीस अटक

0

चिपळूण : चिपळुण शहरातील भोगाळे परिसरातील परशुराम पार्क बिल्डींगमध्ये असलेल्या युनियन बँकेच्या ए.टी.एम. मशीनच्या खोलीमध्ये अनोळखी आरोपींनी दि. ३१/०८/२०२२ रोजी पहाटे ०४.०० ते ०४.३० वाजताचे दरम्यान प्रवेश करुन तेथील ए.टी.एम. मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून, त्या मधील रोख रक्कम चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक स्थितीत दोन अनोळखी तरुण पुरुष आरोपींनी रु .१४,६०,५००/- रोख रक्कम चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत दि. ०१/०९/२०२२ रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथे २२.४६ वा. माहिती प्राप्त झाली व त्याप्रमाणे गुन्हा रजि. नंबर २९१/२०२२ कलम ३८०,४६१ ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तद्नंतर तपासात त्यामध्ये कलम ४३५ भा.दं.वि.सं. या कलमाचा समावेश करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी तपासाची रुपरेषा व सर्व समावेशकतेची दखल घेतली आणि तपासाचा आराखडा तयार केला. सदर गुन्ह्याचा तपास डॉ. सचिन बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण यांच्याकडे दिला.

त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा उलगडा होण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक, रत्नागिरी यांनी तात्काळ (१) श्रीमती जयश्री देसाई, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी (२) श्री सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी आणि पोलीस निरीक्षक स्था. गु.अ. शाखा, रत्नागिरी श्री. हेमंतकुमार शहा व पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस ठाणे रविंद्र शिंदे, तसेच ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक आणि अनेक अनुभवी व निवडक पोलीस अंमलदार यांची एकुण १२ तपास पथकांची स्थापना केली.

या पथकात अंगुली मुद्रा, डॉग स्कॉड तसेच तांत्रीक विश्लेषण शाखा (टॅब) अशा कौशल्य असणाऱ्या पोलीसांचा समावेश होता. घडलेला गुन्हा व वरील पोलीस अधिकारी यांचा अनुभव विचारात घेऊन त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपविली व त्यांना ठराविक उद्दीष्टे देण्यात आली तसेच सर्व तपास पथकांना एकमेकांच्या संपर्कात राहुन संवादामध्ये तुटकता येऊ नये याची काळजी घेण्यात आली. गुन्हयाचे घटनास्थळावरुन प्राप्त माहिती तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयात अशा प्रकारच्या घडलेल्या गुन्हयांची प्राप्त माहिती तसेच वेगवेगळ्या तांत्रीक बाबींचे विश्लेषण करून मिळालेली माहिती आणि तपास पथकातील समाविष्ठ सर्व अधिकारी व अंमलदार यांनी दिवस-रात्र घेतलेल्या मेहनतीने गुन्हयाची माहिती मिळाल्यापासुन २४ तासाचे आत सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

या व्यतिरीक्त सदर गुन्हयाचे तपासात खेड पोलीस ठाणे पासुन ते राजापुर पोलीस ठाणे पर्यंतचे जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा उघड करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेला आहे. 1/3 मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या निगराणी खाली जबाबदारी पार पाडणाऱ्या सपोनि. श्री. प्रविण स्वामी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ) आणि सपोनि. श्री. अमोल गोरे (राजापूर पोलीस ठाणे) यांच्या संयुक्त पथकास या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे गोव्याच्या दिशेस असल्याची माहिती मिळाली. मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दोन्ही अधिकाऱ्यांचे पथक पहाटे गोव्याच्या दिशेने रवाना झाले. रवाना झालेवर महत्प्रयासाने व युक्त्यांचा उपयोग करुन, वरील गुन्हा केलेल्या खालील नमुद गुन्हेगारांना या पथकात असलेल्या पोह. विजय आंबेकर, सागर साळवी, बाळू पालकर, रमीज शेख, पोना. योगेश नार्वेकर, चालक पोना. दत्तात्रय कांबळे, पोशि. निलेश शेलार या पथकाने गोवा येथुन ताब्यात घेतलेले आहे.

अटक आरोपींची नावे खालील प्रमाणे: (१) (२) (३) इरफान आयुब खान, वय ३९ वर्षे, रा. खोली क्र. ६, अनिसा बानु चाळ नं. २. शास्त्री नगर, कलिना मुंबई मुळ रा. रेऊआ, ता. जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश. वासिफ साबिर अली, वय २५ वर्षे, रा. संगमनगर, एन्टॉप हील, मुंबई, मुळ रा. सूजानपूर, पो. बिगेनसुर, ता. राणीगंज, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश, शादाब मकसुद शेख, वय ३५ वर्षे, व्यवसाय वाहन चालक, रा. शर्मा पुंजबी चाळ नं. २, रुम नं. ४, शास्त्री नगर, कलीना, सांताक्रुज (पुर्व), मुंबई. मुळ रा. दादुपुर, पोस्ट राणीगंज, ता. राणीगंज, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश . > वर नमुद आरोपींकडुन चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी खालील नमुद मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ( १ ) रु .४,०५,२९०/- ( चार लाख पाच हजार दोनशे नव्वद रुपये मात्र ) रोख रक्कम. तसेच सदर गुन्ह्यांत वापरलेले खालील नमुद वाहन व आरोपींचे मोबाईल जप्त केले. (१) रु .१०,००,०००/- अंदाजे किंमतीची टोघाटो इनोव्हा गाडी क्र. एमएच ०२ – सीआर -२८७८ ( २ ) रु .४५,००० / – किंमतीचा सॅमसंग कंपनीचा नोट १० प्लस मॉडेलचा मोबाईल फोन ( ३ ) रु .१०,००० / – किंमतीचा व्हिवो कंपनीचा वाय ७२ मॉडेलचा मोबाईल फोन ( ४ ) रु .२५,००० / – किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एस १० प्लस मॉडेलचा मोबाईल फोन एकूण १४,८५,२ ९ ० / – रुपये , वरील प्रमाणे सदर गुन्ह्यात रोख रक्कम व वाहन जप्त केले असून , पुढील तपास सुरु आहे.

या गुन्ह्यातील अटक आरोपींनी या पुर्वी पुणे जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच सदर आरोपींनी परजिल्ह्यात आणि परराज्यात देखील अशा स्वरुपाचे गुन्हे केल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने सुध्दा अधिक तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली ( १ ) श्रीमती जयश्री देसाई , अपर पोलीस अधीक्षक , रत्नागिरी , ( २ ) श्री . सदाशिव वाघमारे , उपविभागीय • पोलीस अधिकारी , रत्नागिरी , ( ३ ) डॉ . सचिन बारी , उपविभागीय पोलीस अधिकारी , चिपळूण ( ४ ) पोनि . श्री हेमंतकुमार शहा ( ५ ) पोनि . श्री रविंद्र शिंदे , ( ६ ) सपोनि . प्रविण स्वामी ( ७ ) सपोनि सुजित गडदे , ( ८ ) सपोनि . रत्नदिप साळोखे , ( ९ ) सपोनि . मनोज भोसले , ( १० ) सपोनि . तुषार पाचपुते ( ११ ) सपोनि . संदीप पाटील , ( १२ ) सपोनि . अमोल गोरे , ( १३ ) पोउनि शाम आरमाळकर आणि या पथकांमध्ये असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सपोफौ , संजय कांबळे , पोह . विजय आंबेकर , सागर साळवी , बाळू पालकर , प्रविण 2/3 खांबे , मनोज जाधव , वृशाल शेटकर , संदीप मानके , मपोह वेदा मोरे , पोना . सत्यजीत दरेकर , रमीज शेख , योगेश नार्वेकर , वैभव नार्वेकर , मनोज लिंगायत , रोशन पवार , उत्तम ईपाळ , करण देसाई , चालक पोना . दत्तात्रय कांबळे , पोशि . निलेश शेलार , कृष्णा दराडे , प्रमोद कदम , गणेश पाडवी , अजय कडु , रुपेश जोगी , वैभव ओहोळ , गणेश शिंदे व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील अनेक पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.

सदरच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी वरील नमूद पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केलेले असून सदर तपास पथकास रोख २५,००० / – रुपये बक्षीस जाहीर केलेले आहे . सदर गंभीर गुन्ह्याच्या तपासकामी मा . श्री . संजय मोहिते , विशेष पोलीस महानिरीक्षक , कोकण परिक्षेत्र यांनी मार्गदर्शन केलेले आहे . तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे .सदर गुन्ह्याचा अधिक तपास डॉ . सचिन बारी , उपविभागीय पोलीस अधिकारी , चिपळूण हे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:34 AM 05/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here