जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका तत्परतेमुळे यकृत प्रत्यारोपण

0

नाणीज : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकाच दुसऱ्या अपघातग्रस्त रुग्णवाहिकेच्या मदतीला धाऊन गेली. त्यातील यकृत व जखमींना घेऊन ती पुण्याला तातडीने धावली.


या घटनेची माहिती अशी, कोल्हापूरकडून पुण्याला रुबी हॉस्पिटलची रुग्णवाहिका ( एम. एच. १४ जेएल ८८०५) यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन चालली होती. त्यांच्यासमवेत दोन डॉक्टर, पोलीस पायलटसह ग्रीन कोरिडॉरमधून पुण्याला चालली होती. त्यावेळी पुणे – बंगलोर महामार्गावर किकवी (ता. भोर) येथे त्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला.

यावेळी वेळेचे गांभीर्य लक्षात घेता किकवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ व सहकाऱ्यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर कितवी येथे कार्यरत असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेकडे मदत मागितली. संस्थांनच्या रुग्णवाहिकेचे (एम.एच. १६ क्यू ९८७२)चालक तुळशीराम रघुनाथ अहिरे त्यासाठी तातडीने तयार झाले. सारे अपघातस्थळी गेले. कारण यकृत तातडीने पुण्याला नेणे आवश्यक होते. मग ते यकृत आणि इतर जखमी लोकांना घेऊन संस्थानची रुग्णवाहिका तत्परतेने, वेळेत सर्वांना रुबी हॉस्पिटल पुणे येथे सोडून आली. त्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया झाली.

या गंभीर आणि तत्पर सेवेची अनेक प्रसारमाध्यमांनी देखील घेतली. रुग्णवाहिकेचे चालक तुळशीराम अहिरे यांना धन्यवाद दिले.
अहिरे यांच्या या कामाचे जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज यांनी कौतुक केले. त्याशिवाय राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, किकवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनीही अहिरे यांचे अभिनंदन केले.

सध्या वेगवेगळ्या महामार्गावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या 36 मोफत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे अनेक अपघातग्रस्तांच्या जीव वाचवले आहेत आतापर्यंत 17000 हून अधिक अपघातग्रस्तांना जीवदान दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:34 AM 05/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here