कोरोनाच्या प्रभावी उपचाराकरिता आरोग्य सेवेची विभागणी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावं. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरं हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची अतीतीव्र लक्षणं आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल, असं उद्धव ठाकरेंनी घोषित केलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here