स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट यांचे कोरोनामुळे निधन

0

कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा जगभरातील आकडा 14 लाख 31,973 इतका झाला आहे. मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून सध्या हा आकहा 82,096 इतका झाला आहे. आतापर्यंत 3 लाख 02,209 रुग्ण बरे झाले आहेत. क्रीडाक्षेत्रालाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आतापर्यंत चार खेळाडूंना कोरोना व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी कोरोना व्हायरसमुळे क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. त्यांनी स्वित्झर्लंडकडून 100हून अधिक सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहेत. ते 79 वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघाने सांगितले की, रॉजर हे दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यानंतर ते घरी परतले आणि एक एप्रिलला त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रॉजर हे स्वित्झर्लंडचे दिग्गज खेळाडू होते आणि 60चं दशक त्यांनी गाजवलं.” रॉजर यांनी 1964च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिवाय 1964च्या स्विस लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम त्यांनी केला. त्यांनी 1958 ते 1976 या कालावधीत हॉकी खेळले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here