अर्शदीप सिंहला ट्रोल करताना पातळी घसरली; विकीपीडियाला केंद्र सरकारकडून समन्स

0

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला हार पत्करावी लागली.

या सामन्यात टीम इंडियाकडून अनेक चूका झाल्या. त्यातच अर्शदीप सिंहनं आसिफ अलीची कॅच सोडल्याने तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. दरम्यान, यानंतर अर्शदीपच्या विकीपीडिया पेजवर बदल झाल्याचं पाहायला मिळालं. अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवर भारतीय ऐवजी खलिस्तानी असा उल्लेख केल्याचं दिसून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने विकीपीडियाला समन्स बजावलं आहे.

अर्शदीप सिंहच्या विकीपीडियावरील माहितीमध्ये छेडछाड

क्रिकेटर अर्शदीप सिंहच्या विकीपीडियावरील माहितीमध्ये छेडछाड झाल्याबद्दल केंद्र सरकारनं विकीपीडियाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली, याबाबत विचारणा करत समन्स बजावलं आहे. सामना हरल्यानंतर विकीपीडिया पेजवर अर्शदीप सिंहचा उल्लेख ‘खलिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळण्यासाठी निवड झालेली आहे, अशी माहिती लिहीण्यात आली होती.

अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती दुरुस्त

भारतीय किक्रेटपटू अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवर त्याचा ‘खलिस्तानी’ असा उल्लेख करण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने खलिस्तान संघटनाना प्रतिबिंबित करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंहची विकिपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली याचे स्पष्टीकरण मागितलं आहे. दरम्यान, आता अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती दुरुस्त करण्यात आली आहे.

केंद्र सरकारचं विकीपीडियाला समन्स

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रानं विकीपीडियाला समन्स बजावत म्हटलं की हे बदल (खलिस्तानी शब्दाचा वापर) भारतात असंतोष निर्माण करू शकतो. यामुळे अर्शदीप सिंहच्या कुटुंबियांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

आशिया चषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्या पाकिस्तानकडून भारताचा पाच विकेट्सनं पराभव झाल्यानंतर अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहितीमध्ये बदल करण्यात आला. या सामन्यात महत्त्वाची कॅच सोडल्यामुळे अर्शदीप सिंहवर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही चाहते अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

पाकिस्तानचा नवा कट?

दरम्यान, अर्शदीप सिंहला ट्रोल करणं, हे पाकिस्तानी हॅकर्सकडून करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. याबबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, केंद्र सरकारनं विकीपीडियाला सम्नस बजावत स्पष्टीकरण मागितलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 05/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here