केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व खासदारांचा दोन वर्षांचा स्थानिक विकास निधी तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री सर्व खासदारांचे वेतन 30 टक्के कपात करून सर्व निधी कोरोना निर्मूलनासाठी वर्ग केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन असा निर्णय केंद्रसरकारप्रमाणे निर्णय घ्यावा. राज्यातील विधान परिषद आणि विधान सभेच्या सर्व आमदारांचा दोन वर्षांचा विकास निधी तसेच सर्व आमदारांचे मंत्र्यांचे वेतन 30 टक्के कपात करून सर्व निधी कोरोना निर्मूलनासाठी वर्ग करावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:13 PM 08-Apr-20
