राजीवडा, साखरतर परिसरातील २ डॉक्टरांसह तब्बल ५२ जण क्वॉरंटाईन

0

रत्नागिरी : जिल्ह्यात राजीवडा व साखरतर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राजीवडा व साखरतर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये २ डॉक्टरांचा समावेश असून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांना बुधवारी अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. साखरतर येथील या महिलेला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला होता. त्यामुळे ती परिसरातील एका महिला डॉक्टरकडे उपचाराकरीता गेली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने या खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर्ससह बसणी येथील एका डॉक्टरला क्वारंटाईन केले आहे. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून साखरतर येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here