जिल्ह्यातील 33,974 मातांना मातृ वंदना योजनेचा लाभ

0

रत्नागिरी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर कालावधीत ‘मातृ शक्ती राष्ट्र शक्ती वंदना’ सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताह मध्ये पात्र लाभार्थीना लाभ देणेसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले आहेत. या योजनेंतर्गंतगेल्या 4 वर्षात जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण 33,974 मातांना 13 कोटी 74 लाख 83 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत संपूर्ण देशात एक ते सात सप्टेंबर 2022 या कालावधीत मातृ वंदना सप्ताह राबविण्याबाबत शासनाकडून आदेशित करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या माताची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या नोंदणी केली असेल. अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्या साठी पुढील प्रमाणे देण्यात येतो.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत लाभार्थाला पाच हजार (5000/-)रुपयेचा लाभ त्यांच्या आधार संलग्नित बँक किंवा पोस्ट खात्या वर वर्ग करण्यात येतो .लाभ देण्याचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा एक हजार रुपये 1000/-रुपये असून मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्या नंतर देण्यात येतो. दुसरा टप्पा दोन हजार रुपये 2000/- रुपये किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यास देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये 2000/- रुपये प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी व बालकास लसिकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. रत्नागिरी जिल्हा मध्ये एकूण 33974 मातांना 13 कोटी 74 लाख 83 हजार रुपये लाभार्थी चे खाते वर योजनेच्या माधमातून अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 06/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here