रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कान्हूराज बगाटे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे एक तास लोकांच्या शंकांचे समाधान केले. याला जिल्हाभरातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी 11 हजारहून अधिक लोकांनी फेसबुक लाइव्ह पाहिले, 146 लोकांनी share केले तर 405 लोकांनी कंमेंट द्वारे प्रश्न विचारले, प्रतिक्रिया दिल्या, आणि प्रशासन, पोलीस यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी समारोपाला ‘yes we can and we will’ हा संदेश देत सगळ्यांनी मिळून कोरोनाचा बिमोड करू हा संदेश जिल्हावासीयांना दिला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:57 PM 09-Apr-20
