आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात; राज्य सरकारचा मोठा निर्णय

0

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:46 PM 09-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here