जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमा : जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग

0

रत्नागिरी : चिपळूण येथील एटीएम मशिन फोडून चोरीचा प्रकार घडल्यानंतर जिल्ह्यातील बँकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. एटीएम मशिन बसवलेल्या ठिकाणी चोविस तास सुरक्षा रक्षक नेमण्यासह सीसीटीव्ही लावण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली.

चिपळूण बोगाटे येथील बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या साह्याने फोडून चौदा लाख रुपये चोरले होते. यामध्ये तिन संशयित चोरट्यांना पोलिसांनी चोविस तासात अटक केली आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी आतापासून पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. पोलिस अधिक्षक गर्ग यांनी रत्नागिरीतील सर्व बँकेच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी सर्व अधिकार्‍यांना मशिनच्या सुरक्षेविषयक सुचना दिल्या. सहा महिन्यापुर्वी पोलिसांनी जिल्ह्याचा आढावा घेऊन एटीएम मशिनच्या सुरक्षेविषयी जाणून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यात अडीचशेहून अधिक एटीएम मशिन आहेत. त्यातील अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे आढळून आले आहे. त्यावेळीही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले नव्हते. त्यानंतर राज्यात एटीएम मशिन फोडून चोरीचे प्रकार घडत असल्याचे पुढे आले. चिपळूणातील प्रकार घडल्यानंतर पोलिस यंत्रणांनीही एटीएमच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याच्या सुचना बँकांना दिल्या आहेत. आरबीआयच्या निकषांचे योग्य पध्दतीने पालन करा असेही बैठकीत सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत बहुसंख्य मशिनच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाईल असे बँकांकडून आश्‍वासन पोलिसांना दिल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 07/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here