स्वयंभू महालक्ष्मी देवस्थानातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

रत्नागिरी : तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासातर्फे कार्यक्षेत्रातील ३०० गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू आणि भाजीचे वाटप करण्यात आले. न्यासाचे सचिव अनिल जोशी, उपमुख्य विश्वस्त शशिकांत बारगोडे, खजिनदार शरद नागवेकर आणि विश्वस्त चंद्रकांत बारगोडे यांनी कारवांचीवाडी आणि पोमेंडी बुद्रुक येथील ग्रामस्थांना प्रत्येकी सुमारे तीन किलो साहित्याचे वाटप केले. सुमारे २८ हजार हजार रुपये किमतीचे हे साहित्य शासनाच्या आदेशानुसार योग्य खबरदारी घेऊन घरोघरी जाऊन देण्यात आले. त्यासाठी निरंजन जोशी आणि अन्य चार स्वयंसेवकांनी तीन दिवस मेहनत घेतली.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत कार्यक्षेत्रात गरजूंना मदत करण्यासाठी न्यासातर्फे कर्तव्य पार पाडण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, असे न्यासाचे मुख्य विश्वस्त प्रा. उदय बोडस यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here