लांजा तालुक्यात हॉस्पिटल उभारण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0

लांजा : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लांजा तालुक्यात हॉस्पिटल उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

आजतागायत लांजा तालुक्यात एकही शासकीय हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गोरगरीब जनतेला होताना दिसत नाही. लांजा तालुक्याचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, संपूर्ण तालुक्यात जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लोकवस्ती असताना शासनाने खास गोरगरीब जनतेसाठी राबविलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लांजा तालुक्यात उपलब्ध होत नाही. कारण त्यासाठी एकही हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेला या आरोग्यविषयक सुविधेचा लाभ मिळताना दिसत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात हॉस्पिटल उभारावे, असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here