कर्णबधिर दिव्यांगांची बेरा टेस्ट डॉक्टरांअभावी बंद

0

रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे मागणी

रत्नागिरी : कर्णबधिर दिव्यांगांच्या बेरा टेस्टसाठी डॉक्टरांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांना देण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी कर्णबधिर दिव्यांगांसाठी बेरा टेस्ट करण्यासाठी डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. त्यामुले कर्णबधिरांना जिल्ह्याच्या ठिकाणी बेरा टेस्ट करून मिळत होती. या टेस्टसाठी कर्णबधिर दिव्यांगांना मुंबई किंवा सावंतवाडी येथे जाण्याचा त्रास वाचू लागला. पण नियुक्त केलेले डॉक्टर काही कारणास्तव सोडून गेले. त्यानंतर बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांनीही येण्यास नकार दिल्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे बेरा टेस्ट मशिन असूनही कर्णबधिरांना मुंबई किंवा सावंतवाडी येथे जावे लागत आहे. तेथेही लगेच तपासणी होत नाही. किमान दोन किंवा तीन फेऱ्या माराव्या लागतात. यामध्ये कर्णबधिर दिव्यांगांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे दिव्यांगांचा त्रास कमी करण्याकरिता तत्काळ रिक्त पद भरण्यात यावे, अशी मागणी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने केली आहे. हे निवेदन रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here