रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्रकिनारी सोमवार ५ सप्टेंबर रोजी काही खासगी आणि सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
या नंतरच्या कालावधीतही या ठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यात येणार असल्यामुळे मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी पोलिसांकडून या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलिसांकडून मांडवी किनारी पडलेले निर्माल्य एकत्र करुन किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथील राखीव पोलिस निरीक्षक रमेश निकम यांच्यासह पोलिस अंमलदार यांनी या सहभाग घेतला होता.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 08/Sep/2022