कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल लावणार : श्री. उदय सामंत

0

कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण केलं जाणं गरजेचं आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या अभिनव उपक्रमाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे कौतुक करून अभिनंदन केलं आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here