रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जप्त वाहनांचा होणार लिलाव

0

रत्नागिरी : मोटार वाहन कर न भरलेली वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहेत. अशा ८ वाहनांचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला आहे.

या वाहनांचा क्रमांक आणि प्रकार असा – MH 08 K 5410, MH 08 W 3761, MH 08 K 5650 ही तिन्ही वाहने तिचाकी सामानवाहक, MH 08 E 6784, MH 08 E 7145, MH 08 K 0508, MH 08 E 1538 ही चार वाहने तिचाकी प्रवासी वाहतुकीची आणि MH 08 8668 हा डम्पर आहे.

ही वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात उभी आहेत. त्यांचा लिलाव २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुकांना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी १३ आणि १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत करता येईल. सविस्तर माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. ई-लिलावाच्या अटी व शर्तींची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध होणार आहे.

लिलावाच्या तारखेपर्यंत थकितदारांना कर भरण्याची संधी राहील, याची वाहनाच्या मालकांनी/ताबेदारांना/वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात थकित कर/पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहन सोडवून न्यावीत किंवा लिलावात हरकत घ्यायची असल्यास १३ सप्टेंबरपर्यंत लेखी हरकत घ्यावी. त्यानंतर काही म्हणणे नाही असे गृहीत धरून त्यांच्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 08/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here