➡ महापालिकेचा दक्षिण कोरियाकडून 1 लाख किट्स विकत घेण्याचा निर्णय
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. केंद्र सरकारने रॅपिड टेस्टसाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. यानंतर दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स आता मुंबई महापालिका विकत घेणार आहे. ते किट्स आल्यानंतर मुंबईत रॅपिड टेस्टिंगला सुरुवात होईल, अशी माहिती आहे. एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झाले आहे की नाही याची तात्काळ माहिती रॅपिड टेस्टमुळे मिळते. तसेच इन्फेक्शन झाले असल्यास त्या व्यक्तीची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.
