देव-घैसास-कीर महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा संपन्न

0

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे उदघाटन प्रमुख अतिथी विनोद एकनाथ कुवार (रत्नागिरीतील उत्कृष्ट कबड्डीपटू ) यांच्या हस्ते झाले. स्पर्धेमध्ये मुलींचा अंतिम सामना कला शाखा आणि वाणिज्य शाखा यांच्यामध्ये झाला. यामध्ये वाणिज्य शाखेने एक गुणांनी विजय मिळविला. मुलांचा अंतिम सामना द्वितीय आणि तृतीय वर्ष वाणिज्य शाखेमध्ये झाला.

यामध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेने विजय संपादन केला. विजेता आणि उपविजेता चषक भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून राजेंद्र जाधव , श्रीपाद गुरव, साईप्रसाद पवार यांनी काम पाहिले. स्पर्धेला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.

मधुरा पाटील ,उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव,पटवर्धन हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे सर, संस्था सदस्य सतिश दळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दीप्ती कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here