ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

0

नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सबंध जगभरातून शोकसंदेश सुरु झाले आहेत. येथील नागरिक त्यांना जड अंतकरणाने निरोप देत आहेत.

HTML tutorial

तर त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये ‘ऑपरेशन लंडन ब्रिज’ हे लागू करण्यात आले आहे. हा एक ब्रिटनमधील प्रोटोकॉल असून निधनाची वार्ता समोर येताच तो लागू करण्यात आला आहे. आता 10 दिवसांसाठी तो कायम असणार आहे. निधनानंतर 10 व्या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

स्कॉटलंडनंतर पार्थिव लंडनला

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव हे आता काही दिवस स्कॉटलंड येथे असणार आहे. त्यानंतर मात्र, ते लंडनला विशेष विमानाने किंवा शाही ट्रेनने नेले जाणार आहे. ऑपरेशन लंडन ब्रिज अंतर्गत हा विधी सुरु राहणार आहे. याच राणीच्या मृत्यू दिवसाला डी-डे असे संबोधले जाणार आहे. एलिझाबेथ द्वितीय यांचे स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले, त्यामुळे तेथे ऑपरेशन युनिकॉर्न राबविण्यात आले आहे. त्यानंतर 10 दिवस नेमके काय असणार हे देखील आपण पाहणार आहोत.

पंतप्रधान करणार संबोधित

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव ब्रिटनमध्ये शाही ट्रेनने आणल्यानंतर सर्वात प्रथम सरकारच्यावतीने येथील पंतप्रधान राजा चार्ल्स हे जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुखवटा म्हणून या रॉयल फॅमिलीची वेबसाईटही काळवंडली जाणार आहे. त्यानंतर राणीच्या मृत्यूची पुष्टी केली जाणार. त्यानंतर मात्र, सोशल मिडियासह सरकारी वेबसाईटवर देखील बॅन असणार आहे.

असे असणार ते दहा दिवस

राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर 24 तासाच्या आतमध्ये जेम्स पॅलेसमध्ये चार्ल्सला राजा म्हणून घोषिक केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणीचे पार्थिव हे बकिंगहॅमच्या पॅलेसमध्ये आणले जाणार. ट्रेनने के लंडनला नेले जाणार आहे. लंडनमधील पंतप्रधानांकडून पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

दिवस 3 ते 5

तिसऱ्या दिवशी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये शोक प्रस्ताव असणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी नवा राजा असलेले चार्ल्स हे ब्रिटनमध्ये दौरा करणार आहेत. राणीची शवपेटी ही बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टरच्या पॅलेसमध्ये हलविण्यात येणार त्यापूर्वी लायन येथे एक तालीमही होणार आहे. वेस्टमिन्स्टरमध्ये एक कार्यक्रमही पार पडणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 09/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here