कोसुंब येथे आज जगद्गुरू नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा

0

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पाटुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी हा सोहळा होणार आहे.

कोसुंब येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे हा सोहळा होणार आहे. जगद्गुरू महाराज संस्थानतर्फे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे.

सप्टेंबर २०१६ ते जून २०२२ वा कालावधीत २६ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आले आहेत. संपूर्ण भारतात ‘ब्लड इन नीड’ या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदात्यांनी ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या हॉस्पिटल येथे जाऊन आपर्यत १७ हजार ७२० जणांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. याशिवाय
मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा, मुंबई-अहमदाबाद, पुणेबेंगलोर, मुंबई-हैदराबाद, रत्नागिरी-नागपूर आदी महामागावर ३७ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहेत. महापूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही या रुग्णवाहिकांमधून रूग्णसेवा देण्यात आली. यामार्फत आतापर्यंत १६ हजार जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

कोसुंब येथे आयोजित पादुका दर्शन सोहळ्याचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 10/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here