नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड यांजकडून गरजूंसाठी ११,०००/- चा निधी

0

लांजा : नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड, पेठदेव, ता. लांजा, जि. रत्नागिरी यांच्यामार्फत मा. तहसीलदार ता, लांजा यांसकडे ११,०००/- चा निधी देण्यात आला. सदर निधी लांजा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती कोरोना विषाणू संसर्गित संशयित होम क्वारंटाईन नागरिकांसाठी तसेच तालुक्यातील परप्रांतीय मजूर कामगार वर्ग यांच्या खाण्यापिण्यासाठी हा निधी मदत म्हणून देण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण (बब्या) हेगिष्टे, मंडळाचे उपाध्यक्ष सतीश राणे, मंडळाचे सचिव प्रकाश जोशी, मंडळाचे संचालक रवींद्र लाखण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here