माझा फोटो डीपीवर ठेवला असला तरी हा सर्व पोलीस खात्याचा सन्मान आहे : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांनी फेसबुक लाइव्हचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सध्या सामान्य जनता आपल्या व पोलिसांच्या कामगिरीवर खूश असून, अनेक जणांनी आपला फोटो डीपीवर ठेवला आहे. त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते का, असा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या कामगिरीमुळे माझा फोटो डीपीवर ठेवला असला तरी सर्व पोलीस यंत्रणा कामगिरी पार पाडत आहेत. त्यामागे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे श्रेय व मेहनत आहे. माझा फोटो डीपीवर ठेवला असला तरी हा सर्व पोलीस खात्याचा सन्मान समजतो. नागरिकांकडून दाखवण्यात येणाऱ्या आपुलकीमुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळते असेही त्यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here