‘वेळप्रसंगी डॉक्टर बनूनही जबाबदारी पार पाडेन’ : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

0

रत्नागिरी : फेसबुक लाइव्हद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कान्हूराज बगाटे यांनी लोकांच्या अडचणी ऐकून त्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी आपण स्वत: डॉक्टर आहात कोरोनाच्या उपचारासाठी गरज पडली तर आपण डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडाल का, असा प्रश्न रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या आपण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. जर वेळ पडली तर डॉक्टर म्हणूनही जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी आहे. पण अशी वेळ येणार नाही, असाही विश्वास डॉ. प्रवीण मुंढे व्यक्त केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here