राष्ट्रवादीच्या आधार-मतदान कार्ड लिंक शिबिराला प्रतिसाद

0

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसने राबविलेल्या आधारकार्डला मतदान कार्ड लिंक करण्याच्या एकदिवसीय शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत रत्नागिरीतील कोकणनगर येथे प्रभाग क्र. ४ मध्ये आधारकार्डला मतदान कार्ड लिंक करून घेण्याचे एकदिवसीय शिबिर मंगळवारी पार पडले. या शिबिराला स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी १५० हून अधिक मतदान कार्ड लिंक करून घेण्यात आली. शिबिरात ७९ जणांची नवीन नोंदणी मतदान कार्ड करण्यात आली. मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करून देण्यात आल्याने स्थानिक जनतेमार्फत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव नौसीन काझी यांच्यामार्फत करण्यात आले. त्यांना प्रभाग महिला अध्यक्ष मुनवर-सुलताना फरहान मुल्ला, महिला तालुकाध्यक्षा शमीम नाईक, शहर उपाध्यक्ष धुर्धना प्रभुलकर यांचे सहकार्य लाभले.असे समाजोपयोगी कार्यक्रम यापुढेही राबवत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवा नेते फरहान मुल्ला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here