ब्रिटनचे राजे म्हणून महाराज चार्ल्स यांनी पदभार स्वीकारला

0

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांची महाराज म्हणून निवड करण्यात आली आहे.

HTML tutorial

महाराज चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे आज पदभार स्वीकारला. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले. एका सोहळ्यात त्यांनी राजेपदाची शपथ घेतली.

चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते.

महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची निवड करण्यात आली. ब्रिटनचे महाराज म्हणून शुक्रवारी पहिल्यांदा किंग चार्ल्स बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये दाखल झाले होते.

प्रिन्स चार्ल्स यांनी पत्नी कॅमिलासह लंडन येथे परतल्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची भेट घेतली. तर, ब्रिटनला त्यांनी महाराजाप्रमाणे संबोधित केले. महाराज चार्ल्स यांनी आपल्या भाषणात दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचे आभार मानत आजीवन जनसेवेची शपथ घेतली. त्याशिवाय, बर्किंघम पॅलेस बाहेर असलेल्या लोकांची त्यांनी भेट घेत महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावरील सात्वंना स्वीकारली. महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे पुढे आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 10/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here