१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरू होणार

0

मुंबई : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे.

दिनांक १० सप्टेंबरपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० ही असेल व प्रतिदिवशी ३० लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूरमध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट येईल. राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील.

सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल, असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 10/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here