कै.त्रि.प.केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, द्वारा फाटक हायस्कूल रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षेत मिळविले विशेष यश!

0

रत्नागिरी : एन टी ए मार्फत यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील कौशिक सत्यवान रेडीज ने 670 मार्कसह, 1613 ऑल इंडिया रँक तसेच 440 कॅटेगरी रँक असे विशेष यश संपादन केले. ह्या यशाने भारतातील पहिल्या 5 शासकीय मेडिकल कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये आपले वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

कु निरंजन हाके ने नीट परिक्षेत 625 मार्कसह 11004 ऑल इंडिया रँक तसेच 4277 कॅटेगरी रँक सह उत्कृष्ठ यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना नामांकित शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.


तसेच व्ही. आय. टी वेल्लोर प्रवेश परीक्षेत कु अंश निर्मल गांधी ने 2946 रँक सह कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रवेश मिळवून तो व्ही.आय.टी वेल्लोर येथे पुढील शिक्षणासाठी रवानाही झाला आहे.कु आकांक्षा रविप्रकाश हिने जे. ई. ई परीक्षेत 98.50 परसेंटाइलसह यश मिळविले आहे.त्यामुळे तिलाही एन्. आय. टी सारख्या नामांकित शासकीय इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळणे सहज शक्य झाले आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. सौ. सुमिता भावे उपकार्याध्यक्ष ॲड. सचिन शिंदे, जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री किशोर लेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना सारख्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर मेहनती मुळे हे यश मिळाले आहे त्याबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी तसेच कॅपसन इन्स्टिट्यूट कोटा द्वारा फाटक हायस्कूल आणि केळकर ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी यांचे तर्फे सर्व शिक्षक मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे व पालक या सर्वांचे कौतुक केले . या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कॅपसन इन्स्टिट्यूट,कोटा यांनी मार्गदर्शन केले होते.यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी रत्नागिरी येथे या परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे आणि शाळेचे आभार मानले आहेत.

ह्या कार्यक्रमाला उप मुख्या. श्री.आनंद पाटणकर, पर्यवेक्षक श्री. किर सर,गोगटे सर,आठल्ये मॅडम,म्हाब्दी मॅडम ,निकम सर आणि इतर मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here