मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत माझ्या भाषेत जाब विचारेन; भास्कर जाधवांचा इशारा

0

परभणी : राज्यकर्ते जे कोणी असतात किंवा राज्याचा जो प्रमुख असतो त्याने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने पाहायचे असते. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. आणि ज्यांना पश्चाताप झाला नव्हता त्यांनाही पश्चाताप होईल की कोणती चुकीची माणसं सत्तेवर आली आहेत. राजकारण बघून आपला पाठिंबा आणि पाठबळ बघून मदत देत असतील तर त्याचा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विधानसभेत आपल्या भाषेत जाब विचारू, असा इशारा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी परभणीत दिला आहे. शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव यांनी हा इशारा दिला.

हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला जात असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव हे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार संजय जाधव यांनी आपल्याला परभणीची परंपरा सांगितली आहे. या परभणीमध्ये अनेक लोक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि शिवसेनेला सोडून गेले. पण इथल्या जनतेने शिवसेनेला कधीच सोडले नाही. इथला खासदार हा शिवसेनेचा कायम निवडून आला. इथला आमदार हा कायमच शिवसेनेचा निवडून आला. इथं भविष्यामध्ये खासदार निवडून येतीलच. पण आमदारांची भरदेखील परभणी जिल्हा टाकेल असा विश्वास जिल्ह्याने दिला आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

ज्या जिल्ह्यामधून शिवसेना सोडून शिंदे गटात कोणी गेले नाही, अशा जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी अत्यल्प मदत देण्यात आली आहे. परभणीला एक कोटी साठ लाख रुपये इतकी मदत देण्यात आली आहे, असा प्रश्न यावेळी भास्कर जाधव यांना विचारण्यात आला. राज्यकर्ते जे कोणी असतात आणि राज्याचा प्रमुख जो कोणी असतो त्याने जनतेकडे समन्यायाने पाहिले पाहिजे. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. आणि ज्यांना पश्चाताप झाला नसेल त्यांनाही पश्चाताप होईल, की कोणती चुकीची माणसं सत्तेत आली आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले.

राजकारण बघून, आपला पाठिंबा आणि पाठबळ बघून मदत मदत करत असतील तर हा अन्याय आहे. परभणीमध्ये खंबीरपणे शिवसेना आहे. इथल्या स्थानिक लोकांना निश्चितपणे न्याय मिळवून दिला जाईल. याची दखल मी घेतलेली आहे. विधानसभेमध्ये याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आपल्या भाषेत जाब विचारणार, असं यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:18 PM 12/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here