कोकणात जाणारी डबलडेकर एक्स्प्रेस सेवा बंद होणार

0

रत्नागिरी : कोकण मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी साल 2015 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून (एलटीटी) ते मडगावसाठी सुरू केलेली वातानुकूलित डबलडेकर एक्स्प्रेस सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या गाडीला सुरुवातीपासूनच फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आठ डबे असणाऱया डबलडेकर एक्स्प्रेसमध्ये केवळ चारच डबे डबल असले तरी त्यांना थांबा देताना रेल्वेच्या सुरक्षा नियमांची आडकाठीही येत असल्याने रेल्वेला अडचण येत होती.

मध्य रेल्वेने ट्रेन क्र. 11085/11086 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक) बंद केली आहे.

नव्या रचनेनुसार
ट्रेन क्र.11099 ः लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 4 नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रा.12.45 वा. सुटेल आणि मडगाव येथे स. 11.30 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 11100 ः ही परतीच्या प्रवासाची गाडी दि. 4 नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दु. 12.45 वा. मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रा.11.45 वा. पोहोचेल.
सुधारित डब्यांची रचना ः 1 फर्स्ट एसी कम एसी टू टीयर, 1 एसी टू टीयर, 8 एसी थ्री टीयर, 6 स्लीपर क्लास, 4 जनरल सेपंड क्लास, 1 ब्रेक व्हॅनसह 1 जनरेटर व्हॅन आणि एक पँट्री कार.

एक्स्प्रेसची वेळ चुकीची
एलटीटीहून ही गाडी स. 5.30 वाजता सुटत असल्याने प्रवाशांना या अडगळीच्या स्थानकावर पोहचण्यासाठी टॅक्सी करावी लागते. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांसाठी एलटीटी येथे पहाटे पोहोचणे अवघड ठरते. तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून स. 5 वा. आणि जनशताब्दी एक्स्प्रेस स. 5.10 वाजता सुटते. आडवळणाच्या एलटीटीस जाण्यापेक्षा सीएसएमटी आणि दादरचा पर्याय अधिक सोपा ठरतो

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 13/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here