जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर, आ. राजन साळवींसमोर शल्यचिकित्सकांच्या तक्रारींचा वाचला पाढा

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि कर्मचारी सध्या प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. कोरोनाचे वाढत जाणारे रुग्ण आणि रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा यामुळे हे कर्मचारी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून काम करत आहेत. यातच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभारावर नाराज होत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शल्यचिकित्सकांच्या तक्रारीचा पाढाच वाचला. कर्मचाऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन व रुग्णालयातील यंत्रणेत व्यत्यय येऊ नये म्हणून आज सकाळी आ. राजन साळवी व शिवसेना नेते, उद्योजक किरण सामंत यांनी तातडीने रुग्णालय गाठले. यावेळी सुमारे २०० कर्मचारी रुग्णालयाच्या आवारात एकत्र जमले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते मेट्रन पर्यंत सर्वानीच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबत तक्रारी सांगितल्या. आमदार राजन साळवी व किरणशेठ सामंत यांनी सामंजस्याची भूमिका घेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांच्यासमोर तोडगा काढूया अशी भूमिका घेतली. यानुसार या कर्मचाऱ्यांच्या पाच प्रतिनिधीना घेऊन आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून जिल्हा शल्यचिकित्सकांना याबात चांगलेच सुनावले. अत्यंत अटीतटीच्या प्रसंगी घटनेचे गांभीर्य ओळखून आ. राजन साळवी आणि किरणशेठ सामंत यांनी या प्रकरणावर तोडगा काढला.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
03:29 PM 10/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here