खेडमध्ये पावसाची संततधार; नद्यांतील पाणीपातळीत वाढ

0

खेड : तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, गेल्या चोवीस तासांत ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या हजेरीने तालक्यातील नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला असून, बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरींनी तारांबळ उडाली आहे.

खेडमध्ये मंगळवार दि.१३ रोजीपर्यंत २ हजार ६३६ मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सह्याद्री रांगामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील बहुतांश नदी पात्रातून पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यात यावर्षी मॉन्सूनच्या पावसाची सरासरी घटली असून या आठवड्यात केवळ २० मिमी सरासरी पाऊस पडला आहे. गतवर्षीपेक्षा ही पावसाची सरासरी कमी आहे. सप्टेंबर महिन्यात ७ ते १३ या दरम्यान एकूण १३९ मिमी पाऊस पडला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 14/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here