जिल्हा रुग्णालयात होणार आता फक्त कोरोना बाधितांवर उपचार

0

रत्नागिरी : कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना इतर रुग्णांना सुरक्षित उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयातील अन्य विभाग गुरुवारपासून इतर ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात ठेवून जिल्हा शासकिय रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासह अन्य सर्व विभाग शाळा, महाविद्यालयांसह खाजगी रुग्णांलयात स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शिर्के हायस्कूलमध्ये हलविण्यात आला आहे. तर लहान मुलांचा विभाग डॉ.चौधरी यांच्या रुग्णालयात हलविण्यात आला आहे. सध्या ज्या रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील विभाग हलविण्यात आले आहेत. तेथेच सरकारी खर्चात रुग्णांवर उपचार होणार आहेत. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी याठीकाणी उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here