आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी मांडवी किनारा स्वच्छतेसाठी विविध संघटना सहभाग घेणार

0

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी येत्या १७ सप्टेंबर २०२२ रोजी रत्नागिरीचा मांडवी किनारा स्वच्छ करण्यासाठी विविध संघटनांनी सहभाग नोंदविला आहे.

किनारा स्वच्छता दिन देशभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी पृथी विज्ञान मंत्रालयाने भारतातील ७५०० हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० पेक्षा अधिक किमी किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे, या दिवशी देशभरातील स्वयंसेवक, भारतीय तटरक्षक दल, नौदल, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि नागरिक या मोहिमेचा भाग असतील. विविध शासकीय कार्यालये, धार्मिक-सामाजिक संस्था, पर्यटन संस्था त्या त्या स्थानिक ठिकाणी विविध बीचसाठी स्वच्छतेची जनजागृती करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मांडवी बीचवर १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानाची बैठक मांडवी पर्यटन संस्था आणि रत्नागिरी पर्यटन संस्था यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हॉटेल सी फॅन मांडवी येथे पार पडली. बैठकीला सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत संयोजक संतोष पावरी, मांडवी पर्यटनचे अध्यक्ष राजीव कीर, भैरी देवस्थानचे राजीव कीर, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे राजन फाळके, भैरव मंदीर ट्रस्टचे विकास मयेकर, सागरी सीमा मंचच्या महिला संयोजिका सौ. तनया शिवलकर, बंदर रोड मित्र मंडळाचे विनय दाते, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, नितीन तळेकर, दयाताई चवंडे, राजन शेट्ये तसेच गिरोबा चौक नवरात्र उत्सव मंडळ, मांडवी चौपाटी भेळ व्यावसायिक, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ, युवा ओबीसी संघर्ष समिती, कित्तेभंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 14/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here