गोळप कट्टयावर शनिवारी श्रीकांत तोसकर यांची मुलाखत

0

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या गोळप कट्टा येथील ३५ व्या कार्यक्रमात येत्या शनिवारी (दि. १७ सप्टेंबर) श्रीकांत तोसकर यांची मुलाखत आदिती काळे घेणार आहेत.

मूळ पानवळचे पण सध्या रत्नागिरी शहरात स्थायिक झालेले तोसकर यांना परिस्थितीमुळे दुसरीतून शिक्षण सोडावे लागले. सातव्या वर्षापासून गुरे राखणे, घरगडी म्हणून काम करणे, हॉटेलमध्ये नोकरी अशी कामे त्यांनी उपजीविकेसासाठी केली. त्यानंतर चाळीस वर्षांपूर्वी वडापावचा स्टॉल सुरू करून वडापाव विक्री आणि रत्नागिरी बाजारपेठेत फिरून चहा विकण्याचा व्यवसाय त्यांनी केला. दिवसरात्र प्रचंड कष्ट करून रत्नागिरीत स्वतःचे घर, बाजारपेठेत स्वतःचे दादाचा कट्टा हॉटेल सुरू केले. दादा वडा नावाने रत्नागिरी बाजारपेठेत प्रसिद्ध असणारे, प्रचंड कष्टाळू आणि विनम्र व्यक्तिमत्त्व असणारे, पराकोटीच्या प्रतिकूलता असताना प्रचंड कष्टाने तिला अनुकूल बनवण्याचे उदाहरण समाजासमोर ठेवणारे श्रीकांत ऊर्फ दादा तोसकर आपला सगळा प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून मांडणार आहेत.

येत्या शनिवारी संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत त्यांची मुलाखत गोळप येथील फिनोलेक्स फाट्याजवळीत पाटणकर कार्यालयात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here