नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे शेतकऱ्यांना फवारणी पंप, नारळ रोपांचे वाटप

0

रत्नागिरी : कोसुंब (ता. संगमेश्वर) येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी शेतकऱ्यांना १०० फवारणी पंप आणि ७०० नारळ रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

सकाळी नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत निशाणधारी सेवक, कलशधारी महिला तसेच आध्यात्मिक देखावे होते. गुरूंवर नितांत प्रेम करा, श्रद्धा ठेवा आणि त्यांनी सांगितलेल्या शिकवणीचे अनुकरण करा, जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रवचनकार सोमदे यांनी आपल्या प्रवचनात सांगितले. यावेळी संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांअंतर्गत शेतकरी बांधवांना फवारणी पंप आणि नारळ रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. शिवाजी माध्यमिक विद्यालयाला अग्निशमन किट देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here