खापणे महाविद्यालयात रक्तगट तपासणी

0

राजापूर : येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्षामार्फत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रा. एस. डी. कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. एम. डी. देवरुखकर यांनी आपल्या मनोगतातून मुलींचा एचबी कमी असण्याची कारणे स्पष्ट केली. या शिबिरात एकूण साठ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन तर पंचावन्न विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र करक कारवली तिठाचे आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका एस. व्ही. केंद्र, आरोग्यसेवक एस. एस. झोरे, एस, एच. गोसावी, के. एम. बडेअपनावर, ग्रामीण रुग्णालय रायपाटणचे नागेश धोंगे, अमोल वाडेकर आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here