सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष आणि BCCI सचिव जय शाह त्यांच्या 3 वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी कायम राहणार आहेत.

त्यामुळे शाह आणि गांगुली ही जोडी दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी या प्रकरणी प्रदीर्घ सुनावणी झाली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेबीसीसीआयच्या घटनेत ठेवण्यात आलेला ‘कूलिंग ऑफ पीरियड’ संपणार नाही, असे सांगत सुनावणी बुधवारपर्यंत वाढवली. अखेर बुधवारी याबाबत ठोस निर्णय झाला असून शाह आणि गांगुली यांचा कार्यकाळ वाढला आहे.

दरम्यान, बीसीसीआयनेसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी ‘कूलिंग ऑफ पीरियड’ संपवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय ही दुरुस्ती शक्य होणार नव्हती.

बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय आणि राज्य मंडळात सलग 6 वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहू शकत नाही. यापुढेही बीसीसीआय किंवा राज्य मंडळात त्याला एखादे पद घ्यायचे असेल, तर त्याला ३ वर्षांच्या कूलिंग पिरियडचा नियम पाळावा लागेल म्हणजेच ३ वर्षे तो अशा कोणत्याही पदावर काम करणार नाही. या नियमांनुसार सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे शाह आणि गांगुली यांचा 3 वर्षांनी कार्यकाळ वाढला आहे.

खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, संबंधित उमेदवार राज्य संघटनेत 6 वर्ष अर्थात दोन टर्म सेवा देऊ शकतो आणि नंतर कूलिंग ऑफ कालावधीची आवश्यकता न घेता बीसीसीआय पदाधिकारी होऊ शकतो. तसेच बीसीसीआयमध्ये दोन टर्म किंवा सहा वर्षे पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयमध्ये अनिवार्य कूलिंग ऑफ कालावधी असेल. अर्थातच सौरव गांगुली अध्यक्ष आणि जय शाह सचिव म्हणून त्यांच्या 3 वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी कायम राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 14/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here