रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर तालुक्यातील आरोग्य केंद्राना भेट देऊन करोनाविषयक तयारीची पाहणी केली. राजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता या रोगापासून सुरक्षित राहावी, यासाठी पालक या नात्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील विविध भागात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची माहिती घेणे हे आपले कर्तव्य आहे, असे श्री. साळवी यांनी सांगितले. रायपाटण ग्रामीण रुग्णालय, करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच फुफेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. या आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
