१४ एप्रिलनंतरही तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण नाहीच

0

कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे देशातील पहिल्या तीन खासगी तत्त्वावर चालणाऱ्या रेल्वेपैकी एक असणाऱ्या तेजस एक्स्प्रेसवर देखील संक्रांत आली आहे. तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. रेल्वेची वाहतूक १४ एप्रिलनंतर सुरू होण्याच्या चर्चांना आता फुलस्टॉप मिळाला आहे. आयआरसीटीसीतर्फे देशात अहमदाबाद-मुंबई, दिल्ली-लखनौ आणि वाराणसी-इंदूरदरम्यान काशीमहाकाल तेजस एक्स्प्रेस चालविण्यात येतात. या तीनही गाड्यांचे आरक्षण ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतलेला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here