पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्याची डेडलाइन वाढवली

0

पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. परिणामी, या योजनांच्या पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी समस्या येत होती. पॉलिसीधारकांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवांसाठी देशभरातील पोस्ट ऑफिस खुले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 13 लाख पॉलिसीधारकांचा फायदा होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here