दापोलीत होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट

0

रत्नागिरी : दापोली तालुक्यात होम क्वारंटाईन असणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी तेलेश्वर इथे ही घटना घडली आहे. २० ते २२ मार्च दरम्यानच्या काळात सदर व्यक्ती मुंबईतील घाटकोपर येथून त्या ठिकाणी गेली होती. ज्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे दापोली प्रशासनात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल म्हणून या व्यक्तीचे स्वॅब नमुनेही घेण्यात आले. शिवाय मृतदेह नेणाऱ्या दहाजणांनाही कोरोनाची भीती पाहता सावधगिरी म्हणून क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी याविषयीची माहिती दिली. दरम्यान, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here