शनिवारी पंतप्रधान व सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

0

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची येत्या शनिवारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here