चिमुरडीने वाचविले अडीच वर्षांच्या मुलाचे प्राण

0

रत्नागिरी : संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांच्या अवघ्या तीन वर्षे दहा महिने वयाच्या कन्येने प्रसंगावधान राखून अडीच वर्षांच्या मुलाचे प्राण वाचविले. सुज्ञा आणि श्रीकर हे देवरूखमधील केशवसृष्टी भागातील लिमये यांच्या घराजवळ खेळत होते. खेळता खेळता ही दोघेही घराच्या मागील बाजूला गेली. तेथे तीन फुटांचा शोषखड्डा आहे. या खड्ड्यावर सिमेंटचा पत्रा टाकलेला होता. खेळताना ही दोन लहान मुले त्या पत्र्यावर गेली आणि पत्रा फुटला. काही कळायच्या आतच श्रीकर खाली कोसळणार, इतक्यात समयसूचकता आणि प्रसंगावधान राखत सुज्ञाने एका हाताने पत्रा आणि दुस-या हाताने श्रीकरला धरून ठेवले. सुज्ञाने काहीच केले नसते, तर श्रीकर खाली पडला असता आणि पत्रा त्याच्या अंगावर पडून अपघात झाला असता. दरम्यान, काहीतरी आवाज झाला म्हणून श्रीकरची आई तेथे आली आणि समोरचे दृश्य पाहून हादरूनच गेली. तोपर्यंत आरडाओरडा ऐकून अनेक जण तेथे जमा झाले आणि त्यांनी या दोघांना घरात आणले. सुज्ञाच्या या प्रसंगावधानाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here